शुक्रवार, ३१ मे, २०२४

कासेगाव येथील श्री महादेव मंदिर




कासेगाव येथील श्री महादेव मंदिर 

कासेगाव मध्ये अनेक मंदिरे असून सर्वात पुरातन मंदिर हे श्री शंभू महादेवाचे आहे हेमाडपंथी बांधकाम शैलीतील हे मंदिर असून उंच चबुतऱ्यावरती हे मंदिर बांधलेले दिसून येते बांधकामामध्ये महाकाय अशा काळ्या पाषाणाचा  वापर केलेला असून अखंड मोठमोठ्या दगडांवरती दगड ठेवून मंदिराची निर्मिती केलेली दिसून येते. समोर एकच सभामंडप असून त्यामध्ये खांबांवरती केलेले कोरीव काम हे अतिशय उत्कृष्ट असे आहे या मंदिराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील गर्भगृह व त्यातील महादेवाचे असणारे सिंहासनाधिष्ठित शिवलिंग होय अशा प्रकारचे सिंहासनावर शिवलिंग असणारे हे एकमेव मंदिर आहे. सभा मंडपाच्या बाजूने संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणेसाठी मार्ग असून प्रदक्षिणामार्गावरती केलेल्या कोरीव कामांमध्ये अनेक यक्ष, किन्नर, गणपती, हनुमान यांच्या मुर्त्या दिसून येतात.  या सर्वात महत्त्वाचे म्हणजे  काही ठिकाणी कामशिल्पे ही दिसून येतात. या सर्व शिल्पांमध्ये सृजनशीलतेचे प्रतीक असणारे मातृशिल्प हे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. मंदिराच्या गर्भ गृहावरती अंदाजे 25 फूट उंच एवढे शिखर असून त्यामध्ये ही विविध मुर्त्या व देव देवतांचे देखावे कोरलेले दिसून येतात. हे सर्व काम अगदी अलीकडील काळातील असे आहे सभा मंडपावरील भागामध्ये बाहेरील बाजूस आपणास विविध संत व देवी-देवतांचे मूर्ती पहावयास मिळतात यामध्ये गरुड व हनुमंताची उभारलेली मूर्ती लक्ष वेधून घेते. दर्शनी भागात असणारे रामपंचायतन शिल्प अगदी आकर्षक आहे मंदिराच्या स्वागत प्रमाणे वरती श्री शंभू महादेव पार्वती व गणेशाची मूर्ती कोरलेली दिसून येते याच मंदिराच्या सभामंडपामध्ये तीन ते साडेतीन फूट उंच पितळी नंदी पहावयास मिळतो.

 या ठिकाणी फक्त श्री शंभू महादेवाचे मंदिर नसून आणखी दोन मंदिरे म्हणजेच तीन मंदिराचा समूह आपणास पहावयास मिळतो यामध्ये एक मंदिर हे श्री गणेशाचे असून दुसरे मंदिर हे श्री बळी या देवतेचे आहे तीनही मंदिरे ही हेमाडपंथी शैलीतील आहेत बळी मंदिराचा उत्तरेकडील भाग गावकऱ्यांनी पाडून टाकला असला तरी आजही तो सुस्थितीत असल्याचे बघावयास मिळते मंदिराच्या बाजूलाच पूर्वीच्या काळी एक मठ उपलब्ध असल्याचे पहावयास मिळते परंतु तो नक्की कोणत्या संप्रदायाचा किंवा पंथाचा होता याची माहिती मात्र उपलब्ध होत नाही आज मठाच्या नावावरती फक्त एक चौक उपलब्ध असल्याचे आपणास पहावयास मिळते.

मंदिराच्या बाजूस थोड्याच अंतरावरती सुस्थितीत बांधलेली  बारव असून यातूनच गावाला पाणीपुरवठा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वेळ अमावस्या

  वेळ अमावस्या वेळ   अमावस्या   शेतातील   पूजा ग्रामीण कृषी संस्कृतीतील एक महत्वाचा सण...